सावदा प्रतिनिधी
वैष्णव पंथ चर्मकार मठ कोथळी यास आ चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्नाने जागा पुर्ववत मिळवून दिली
संत मुक्ताई मंदिर,कोथळी येथे मंदिराच्या पुर्व दिशेला "वैष्णव पंथ चर्मकार मठ" फार पुर्वी पासून होता, परंतु, मंदिर बांधकामाचे काम मागील वर्षांपासून सुरु झाल्याने मठ तेथून काढण्यात आला. त्या दिवसापासून मंदिर परिसरात चर्मकार समाजाला मठासाठी जागा मिळावी म्हणून सतत मागण्या चर्मकार बांधवांनी केल्या., नुकत्याच आठ दिवसांपूर्वी चर्मकार समाजातील बांधव मा.आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचेकडे आले व त्यांनी मठासाठी भाऊंकडे विनंती केली भाऊंनी त्यांच्या विनंतीस मान देत दि. 29 रोजी चर्मकार समाज बांधवांसह चर्मकार समाज मठासाठी योग्य अश्या जागेची पहाणी केली व लवकरच मंदिर परिसरात, मंदिराच्या पुर्व दिशेला 4000 स्वे.फुट जागा मठासाठी देण्यात येईल असे आश्वासन दिले., तेव्हा चर्मकार बांधवांनी जोरदार टाळ्या वाजवून मा.आ.श्री.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे आभार मानले...यावेळी ह.भ.प.श्री.रविंद्र महाराज हरणे, ह.भ.प.श्री. उध्दव महाराज, ह.भ.प.श्री.वानखेडे गुरजी, ह.भ.प.तायडे गुरजी, ह.भ.प.ठोसरे गुरजी, चंदनकर सर, भोंडेकर सर, धनंजय एदलाबादकर, महेंद्र जयकार, अँड. राहुल पाटील, पंकज राणे, गोविंदा सुर्वे, विनोद सुरवाडे, विनोद घुले, पंडित निंभोरे, प्रमोद रझोदकर, योगेश घुले, अतुल हिंगोणेकर, कैलास शिर्के, भागवत शिर्के, राजु घुले,इ. समाज बांधवांसह गोपाळ सोनवणे, सुनिल पाटील, सुभाष पाटील, प्रशांत टोंगे, स्विय्य सहाय्यक संतोष कोळी यांची उपस्थिती होती...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत