वाघोदा खुर्द कोरोनाचा शिरकाव, मुख्यध्यापक पॉझिटिव्ह
वाघोदा खुर्द कोरोनाचा शिरकाव मुख्यध्यापक पॉझिटिव्ह
सावदा येथून जवळच असलेल्या वाघोदा खुर्द येथील एलआयसी कॉलनीतील रहिवाशी थोरगव्हाण येथील ५२ वर्षीय मुख्यध्यापक गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद येथील रूग्णालयात उपरार्थ दाखल करण्यात आले आहे .कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्याचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.आज त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे उप आरोग्य केंद्राचे निरीक्षक डॉ.सारंग पाटील यांनी यांनी सांगितले.एलआयसी कॉलनीत रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने बी डी ओ सोनिया नाकोडे, ग्रामसेवक शिवाजी सोनवणे, तलाठी पी जी चोपडे, सरपंच रवी कोलते, पोलीस पाटील राजेश कोलते जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरोग्य पथकातर्फे संपुर्ण परिसर सील करण्यात आला आहे त्यांचे संपर्कातील घरातील व्यक्ती ना सावदा येथील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत