सावदा येथे संगणकीकृत ७/१२ दुरुस्ती शिबिराचे २६ रोजी आयोजन
सावदा येथे संगणकीकृत ७/१२ दुरुस्ती शिबिराचे २६ रोजी आयोजन
सावदा प्रतिनिधी- येथे सावदा मंडळातील सावदा,गाते,वाघोदा-खुर्द,सुनोदा,थोरगव्हाण,मांगी,चुनवाडे,तासखेडे,लूमखेडे,उदळी बुद्रुक,उदळी खुर्द,रणगाव,सूदगाव,मस्कावद बुद्रुक,मस्कावद खुर्द, मस्कावद सीम या गावातील खातेदारांना आवाहन करण्यात येते की संगणकीकृत ७/१२मध्ये काही चुका असतीलhttps://www.lewajagat.com/2021/06/Pakshat.lach.ghetana.police.v.homgard.yana.atak.html
तर त्यांनी अर्ज घेऊन २६ जून रोजी हजर राहावे. या सजेतील गावांमधील संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्तीसाठी मंडळ स्तरीय शिबिराचे आयोजन दि . २६ शनिवार रोजी करण्यात आले आहे . संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्ती करणे, ( १५५ अंतर्गत ) , संगणकीकृत सातबारा हस्तलिखित सातबारा चे वाचन करणे , फेरफार नोंद करण्यासाठीचे अर्ज स्वीकारणे , ज्या फेरफार नोंदी प्रमाणिकरणासाठी असतील त्या निर्गत करणे , संगणकीय अहवाल,ओडिसी प्रणित अहवाल दुरुस्ती करणे असे शनिवार रोजी दिवस भर सुरू असेल तरी परिसरातील शेतकऱ्यांना याद्वारे आवाहन करण्यात आले आहे की , सावदा मंडळातील खातेदार यांना आवाहन करण्यात येते की , आपल्या संगणकीकृत दाखल उपलब्ध नोंदी दुरुस्त करून घाव्या असे आवाहन महसूल मंडळा
मार्फत बी एम पवार (मंडळ अधिकारी),शरद पाटील (तलाठी सावदा), प्रोपेश चोपडे (तलाठी गाते), मोमीन तलाठी (उदळी बुद्रुक), ओमप्रकाश मटाले (तलाठी मस्कावद बुद्रुक),हनिफ तडवी तलाठी (थोरगव्हाण), श्रीहरी कांबळे (तलाठी रायपूर)यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत