पाळधीत लाच घेताना पोलिस , होमगार्ड जेरबंद ; दोघांना रंगेहाथ केली अटक |
पाळधीत लाच घेताना पोलिस , होमगार्ड जेरबंद ; दोघांना रंगेहाथ केली अटक |
पाळधी प्रतिनिधी- परिसरातील अवैध धंद्याविरोधात कारवाई न करण्यासाठी पाळधी आऊट पोस्टचे पोलिस नाईक व होमगार्ड यांनी अडीच हजार रुपयांची लाच स्विचारली . दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले . यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चांदरस येथील तक्रारदाराने तक्रार केली होती . त्यानुसार जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई केली . तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्ह्यातील वॉरंटमध्ये त्यांना मदत करण्यासाठी , तसेच तक्रारदाराच्या दारू विक्रीच्या व्यवसायावर परत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात , संशयित तथा पाळधी दूरक्षेत्राचे पोलिस नाईक किरण चंद्रकांत सपकाळे ( वय ३७ ) , यांनी अडीच हजार रुपये लाचेची मागणी केली . त्यांच्या सांगण्यावर होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे याने लाच स्विकारली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत