Header Ads

Header ADS

बोईसर टिमा हॉल येथे २४ ला लसीकरण

 


बोईसर टिमा हॉल येथे २४ ला लसीकरण

 बोईसर प्रतिनिधी-येथील टिमा हॉल येथे दिनांक २४ रोज गुरुवार या दिवशी

 लसीकरण केंद्र सुरू राहणार असून सदर ठिकाणी १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा  पहिला व दुसरा(लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले असल्यास) डोस उपलब्ध होईल.

  केंद्रावर ऑनलाइन रजिस्ट्रेशनने (ज्यांना आजची ऑनलाईन बुकींग मध्ये अपॉइंटमेंट मिळाली आहे) अशांनाच ३०० व ऑफलाईन रजिस्ट्रेशनने(ऑन स्पॉट) १०० असे कोविड-१९ प्रतिबंधक लसीचे एकूण ४०० डोस उपलब्ध होतील. 

     नागरिकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सकाळी ९ ते १२ या वेळेत करता येईल. सदर रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांचे सकाळी १०.०० ते १.३० या वेळेत लसीकरण केले जाईल.दुपारी १.३० ते २.३०वाजे पर्यंत  जेवणाची वेळ असून त्या वेळी लसीकरण बंद राहील,.

      नागरिकांनी ऑफलाईन (ऑन स्पॉट) रजिस्ट्रेशनने लसीकरणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या १०० नागरिकांचे सकाळी ९.३० ते १० या वेळेमध्ये नाव नोंदवून टोकन दिले जाईल. टोकन क्रमांक १ ते ५० यांचे लसीकरण दुपारी २.३० ते ३.३० टोकन क्रमांक ५१ ते १०० यांचे लसीकरण ३.३० ते ५ या वेळेत केले जाईल. ऑफलाईन(ऑन स्पॉट) लसीकरणाचा लाभ घेण्याकरिता दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित रहावे. तसेच टोकन सोबत आणून नोंदणी कक्षामध्ये जमा करणे आवश्यक राहील.असे आवाहन डॉ.गणेश पांचाळ नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दांडी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.