विद्यापीठाने एमएस्सी ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पेपर पुढे ढकलला
विद्यापीठाने एमएस्सी ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पेपर पुढे ढकलला
प्रतिनिधी जळगाव-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित एमएस्सी (सत्र- १) न्यू परीक्षेचा केमिस्ट्रीचा कॉमन पेपर सीएच-१५०: ऑरगॅनिक केमिस्ट्री-१ विषयाची १६ फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली असून विषयाची परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत आयोजित करण्यातआली आहे. १६ फेब्रुवारी रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीजमार्फत जॉइंट सीएसआयआर यूजीसी नेट - परीक्षेचे आयोजन असल्यामुळे एम. एस्सी. (सत्र- १) (New) परीक्षेचा केमिस्ट्रीचा कॉमन पेपर सीएच-१५०: ऑरगॅनिक केमिस्ट्री - १ हा परीक्षेमुळे पुढे ढकलण्यात आला असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी कळवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत