पीएम किसान, मार्चपर्यंत करा ई-केवायसी
पीएम किसान, मार्चपर्यंत करा ई-केवायसी
जळगाव प्रतिनिधी :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सर्वपात्र लाभार्थ्यांना एप्रिल-जुलै २०२२ या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक आहे. या ई-केवायसीचे प्रमाणिकरण ३१ मार्चअखेरपर्यंत पूर्ण करावे लागेल. यासाठी पात्र लाभार्थी शेतकरी यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवरील फार्मर कॉर्नरमधील ई-केवायसी या टॅबव्दारे किंवा पी.एम. किसान अॅपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थींना स्वत: ई-केवायसी प्रमाणिकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक
सेवा केंद्र केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमेट्रिक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने प्रमाणिकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमेट्रिक प्रमाणीकरण दर १५ रुपये निश्चित केल्याचे जिल्हाधिकारी अभिजित न साप राऊत यांनी कळवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत