"सावद्यात गरजला हरिनामाचा जयघोष" नगरपालिका शाळांचा अनोखा उपक्रम
"सावद्यात गरजला हरिनामाचा जयघोष" नगरपालिका शाळांचा अनोखा उपक्रम
लेवाजगत न्युज:- रावेर तालुक्यातील सावदा शहरातील नगरपालिका सावदा संचलित, श्रीमती आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल व श्री ना गो पाटिल कनिष्ठ महाविद्यालय सावदा आणि श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या शाळा सावदा.
या दोन्ही शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपारिक वेशभूषा करत रस्त्याने भजन करत विठ्ठलाचे जयघोष , नाम कीर्तन करत पूर्ण सावदा शहरामध्ये ग्राम प्रदक्षिणा केली. त्याचप्रमाणे विठ्ठल नामाचा गजर करत ठीक ठिकाणी लेझीम आणि पावली खेळत शहरवासी यांचे चित्त आकर्षित करून घेतले. शाळांचे असा अनोखा उपक्रम पाहून शहरातील नागरिकांनी कौतुक केले.
याप्रसंगी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या वारीमध्ये सहभागी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत