Header Ads

Header ADS

व्हिडीओ -ब्लास्ट नंतर गाडी टाक्या रॉकेट सारख्या उडाल्या, गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला नाशिक मालेगाव रोडवर आग

ब्लास्ट नंतर गाडी टाक्या रॉकेट सारख्या उडाल्या


ब्लास्ट नंतर गाडी टाक्या रॉकेट सारख्या उडाल्या

गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला नाशिक मालेगाव रोडवर आग

 लेवाजगत न्यूज नाशिक : जिल्ह्यात मागील काही तासांपासून दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन त्यामध्ये आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळच पुणे इंदौर महामार्गावर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकला आग लागल्यानंतरfire सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक २ किलोमीटर अंतरावरच रोखून ठेवण्यात आली आहे. ट्रकमध्ये गॅस ने भरलेले सुमारे २०० सिलेंडर असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओ बघा-ब्लास्टनंतर गाडीटाक्या रॉकेट सारख्या उडाल्या,गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला नाशिक मालेगाव रोडवर आग-https://youtu.be/6B_ATMu9dmw


      घटनेची माहिती मिळताच अग्निशमनाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अपघातामध्ये चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.