वृत्तांकन करताना उपसंपादकास धक्काबुक्की दोषींवर कार्यवाही करा
वृत्तांकन करताना उपसंपादकास धक्काबुक्की दोषींवर कार्यवाही करा
प्रतिनिधी सावदा- दुर्गा विसर्जनाचे वार्तांकन करतांना पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी तिघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, लेवा जगतचे उपसंपादक तथा लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे प्रतिनिधी जितेंद्र कुलकर्णी हे सावदा येथील सर्व पत्रकारांसोबत दिनांक ६रोजी रात्री नवदुर्गा विसर्जनाचे वार्तांकन करत होते. याप्रसंगी त्यांना पोलिसांशी हुज्जत घालतांना काही जण दिसले. यामुळे ते सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी जाताच लतेश रमेश सरोदे याच्यासह दोन जणांनी जितेंद्र कुलकर्णी यांना धक्काबुक्की केली. शहरातील सर्व पत्रकार आणि पोलीस पथकाच्या समोरच हा प्रकार घडला. या प्रकरणी पत्रकार जितेंद्र कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून लतेश रमेश सरोदे याच्यासह तिघांच्या विरोधात भादंवि कलम ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सावदा येथील पत्रकारांनी तीव्र निषेध करत दोषींना कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत