सोने १७०० रु.ने सात दिवसांत घसरले; विक्रीत घट, मोड वाढली,गेल्या शुक्रवारी ७४,१०० चे दर गुरुवारी आले ७२४०० रु. वर
सोने १७०० रु.ने सात दिवसांत घसरले; विक्रीत घट, मोड वाढली,गेल्या शुक्रवारी ७४,१०० चे दर गुरुवारी आले ७२४०० रु. वर
वृत्तसंस्था जळगाव-गेल्या दीड ते दोन महिन्यांत सोन्याच्या दरात जवळपास १० ते ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, गेल्या सात दिवसात ७४,२०० ही सर्वाधिक उच्चांकी दर पातळी गाठून सोन्याच्या प्रती तोळ्याच्या दरात १,७०० रुपयांची घसरण झाली आहे. दरवाढ व घसरण यांचा परस्परविरोधी परिणाम सराफ बाजारावर होत आहे. दरवाढीमुळे उलाढाल २० ते २५ टक्के घटली आहे. तर घसरण झालेले दरही आतापर्यंतचे उच्चांकी दर असल्याने मोडीचे (जुने सोने विक्री करण्याचे) प्रमाण दीडपटीने वाढले असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गेल्या शुक्रवारी सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ७४१०० रुपये होते. त्यापूर्वीच्या आठवड्यात ते ७४२०० या सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोहचले होते. मात्र, त्यानंतर सोमवारपासून सुरू झालेल्या चालू आठवड्यात गुरुवारपर्यंत सोने दरात तब्बल १७०० रुपयांची घसरण होऊन सोने ७२४०० रुपये तोळ्यावर खाली आले आहे. सोन्याच्या दरातील चढउतार याला सद्यस्थिती इराण व इस्त्राईल या दोन देशातील युद्धजन्यस्थिती हे उर्वरित. प्रमुख कारण असल्याचे सराफांचे म्हणणे आहे. १७०० रुपयांची घसरण, उलाढाल आणखी ५ टक्के घटली सोन्यातील दरवाढीसह लग्नसराईच्या तारखा कमी असल्याने सराफी बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे. सरासरी हे प्रमाण २० टक्क्यांनी घटले आहे. या आठवड्यात १७०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे दर अजून खाली येतील या शक्यतेने लग्नसराईची खरेदीही थांबली आहे. त्याचे प्रमाण ५ टक्क्यांच्या जवळपास असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत