Contact Banner

 *काश्मीरमध्ये जमावबंदी; देशभरात संभ्रमाचे वातावरण!*

लेवा जगत शाम पाटील

 जम्मू काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींनी घेतला वेग, राज्यात कलम 144 (जमावबंदी) लागू

● तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ
● इंटरनेट आणि लँडलाईन सेवाही बंद 
● मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला नजरकैदेत
● सर्व सरकारी शाळा, महाविद्यालयं आणि इतर संस्थांना आज सोमवारपासून सुट्टी
● कोणत्याही प्रकारची सभा, रॅली किंवा जिथे जमाव एकत्र येईल अशा सगळ्या कृतींवर बंदी
● इरफान पठाणसह 100 क्रिकेटपटूंना तत्काळ राज्य सोडण्याचे आदेश

काश्मीरमध्ये घडणाऱ्या घडामोडींबाबत देशात संभ्रमाचे वातावरण, कलम 35 अ बाबतही महत्त्वाचा निर्णय या आठवड्यात घेतला जाईल अशीही शक्यता आहे

*सरकार देणार उत्तर* :

● काश्मीरच्या प्रश्नावर केंद्र सरकारची भूमिका काय? हे आता अवघ्या काही तासांत समजणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (दि.5) सकाळी 9.30 वाजता, यात काश्मीर खोऱ्यातील प्रश्नावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता
● या बैठकीत घेतलेला निर्णय आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती यावर सरकार संसदेत उत्तर देणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.