Contact Banner

 *'20 ऑगस्टला 'चांद्रयान-2' चंद्राच्याजवळ पोहोचेल'*
(लेवाजगत वृत्त संकलन )
 इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी चांद्रयान-2 बाबत माहिती दिली.

 *डॉ. के. सिवन म्हणाले* :

● चांद्रयान-2 पृथ्वीची कक्षा ओलांडून 14 ऑगस्टला चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करेल.
● त्यानुसार, हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जाईल, याला ट्रान्स लुनार इंजेक्शन असे संबोधतात.
● त्यानंतर हे यान चंद्राच्या दिशेने रवाना होईल.
● त्यानंतर ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेतून जाईल.
● या प्रक्रियेनंतर पुढील 8 दिवसांत म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी चंद्राजवळ पोहोचेल
● त्यानंतर यानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येईल.
● त्यानंतर अखेर 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान-2 चंद्रावर उतरेल.

 इस्रोने 22 जुलै रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन आंतराळ केंद्रावरुन चांद्रयान-2चे प्रक्षेपण केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.