Contact Banner

ब्रेकिंग! सुषमा स्वराज यांचे निधन*

*ब्रेकिंग! सुषमा स्वराज यांचे निधन*
प्रतिनिधी
ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन

👉 त्या 67 वर्षांच्या होत्या, त्यांच्या पश्चात पती स्वराज कौशल आणि कन्या बांसुरी आहेत

  हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचे आधीच निधन झाल्याचे झाले स्पष्ट
 *मितभाषी आणि कणखर सुषमा* :
● सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होत्या. भाजपाच्या महिला नेत्यांमध्ये त्यांचे स्थान वरच्या क्रमांकावर होते.
● आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषण शैलीसाठी त्या ओळखल्या जात होत्या. लोकसभा आणि राज्यसभेतील त्यांची अनेक भाषणं चर्चेत राहिली.
● सुषमा स्वराज या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकीलदेखील होत्या.
● 1977 साली वयाच्या केवळ 25 व्या वर्षी त्या पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पदही भूषवले होते. 
● 2009 आणि 2014 मध्ये मध्यप्रदेशच्या विदिशामधून निवडणूक जिंकल्या होत्या. या दरम्यान त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका संसदेत मांडली होती.
● माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर सुषमा स्वराज दुसरी महिला होत्या ज्यांनी परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती.
 परराष्ट्र मंत्रालयाचा भार पेलल्यानंतर 2019 साली मात्र सुषमा स्वराज यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता.

 स्वराज यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच सर्व क्षेत्रातील लोकांनी व्यक्त केला शोक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.