Header Ads

Header ADS

मुक्ताईनगर तालुक्यातील मन्यारखेडा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्काने खळबळ 14 जणांना पुढील कोरोना चाचणीसाठी जळगांवला हलविले

 मुक्ताईनगर तालुक्यात कोरोनाची धडक ?तालुक्यातील मन्यारखेडा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्काने खळबळ 14 जणांना पुढील कोरोना चाचणीसाठी जळगांवला हलविले

मुक्ताईनगर : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एक 65 वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल काल प्रशासनाला प्राप्त झाला होता .सदर ची पॉझिटिव्ह महिला मुक्ताईनगर तालुक्यातील मन्यारखेडा या गावात 13 दिवस आधी मुक्कामी राहिल्याची माहिती आज सकाळी प्रशासनाला कळताच तेथे  तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील व आरोग्य कर्मचारी यांनी मन्यारखेडा गावात धाव घेतली व महिलेचा ज्या ठिकाणी मुक्काम होता त्या ठिकाणाहून अकरा जणांना पुढील तपासणी साठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे .अशी माहिती मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे यांनी दिली .

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू असले तरी कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत नसून कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे . नुकतेच काल भुसावळ व मलकापूर येथीलसंशयीत रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आला असून मलकापूर येथील कोरोना पॉझिटिव्ह 65 वर्षीय महिला ताप व खोकला आल्याने मलकापूर हुन 20 एप्रिल रोजी मूलगा व सून यांच्यासोबत तालुक्यातील मन्यारखेडा येथील नातेवाईकाच्या ओमनी गाडीने  जळगांव येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ गेली होती  .तेथे दवाखान्यात त्या महिलेचा दुसरा मुलगा, सून व नातवंडे हे देखील बघण्यासाठी गेले होते .खाजगी डॉक्टर ने त्यांना जळगांव सामान्य रुग्णालयात पाठविले . त्यानंतर जळगांव नातेवाईकाकडे मुक्कामी रहात ही महिला दि 21 रोजी रिक्षाने पुन्हा त्याच खाजगी दवाखान्यात गेली . तिला सिटीस्कँन काढण्याचा सल्ला दिला परत ती महिला  रिक्षाने सामान्य रुग्णालयात गेली .21 रोजी सदर महिलेचे थुंकीचे नमुने (स्वब) घेतले .सदर नमुने घेतल्यानंतर महिलेचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला . मात्र ही महिला दवाखान्यात जाण्याआधी मुक्ताईनगर तालुक्यातील 300 लोकवस्ती असलेल्या मण्यार खेडा गावात ओमनी चालक  भाचा असलेल्या नातेवाईकाकड़े 13 दिवस मुक्कामी होती . ही वार्ता 26 रोजी तालुक्यातील रुईखेडा व मन्यारखेडा परिसरात पोहोचताच गावकऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले .
*****************************************
" रुईखेडा व मन्यारखेडा परिसरात सदर महिलेचा रहिवास झाल्याने नागरिकांत प्रचंड दहशतीत मोठा जमाव जमला असल्याची माहीती  मिळताच पोळी प्रशासन व आरोग्य विभागाला माहिती दिली .तसेच दहशतीमुळे रुईखेड्यात गर्दी जमत होती म्हणून गर्दी कमी आवाहन केले अशी माहिती रुईखेडा पोलिस पाटील सविता अनंत बढे यांनी दिली . "
*****************************************
"कोरोना पॉझिटिव्ह महिला मन्यारखेडा गावात रहिवास करून गेल्याची माहिती मिळताच पूर्ण मन्यारखेडा गाव व रुईखेडा परिसर बंद करण्यात आले असून बाहेरच्या व्यक्तींना गावबंदी करण्यात आली असल्याची माहिती रुईखेडा - मन्यारखेडा गृप ग्रामपंचायत चे सरपंच वासुदेव बढे यांनी सांगितले. "
*****************************************
" कोरोना पॉझिटिव्ह महिला अर्धांगवायू च्या उपचारासाठी जळगांव येथे मन्यारखेडा येथील भाचा असलेला ओमनी चालक यांचेसह नेहमी जातं येत असल्याची तेरा दिवसाआधी पण ती महिला मण्यार खेडा येथे भाच्याकडे मुक्कामी होती . व सदर महिलेच्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालामुळे गावामध्ये मध्ये दहशत माजली होती .सकाळी आरोग्य विभागाचे प्रथकाने येथे येऊन निर्जंतुकीकरण फवारणी केली तसेच 14 जणांना जळगांव येथे पुढील तपासनी साठी जळगांव येथे पाठविण्यात आले असल्याची मन्यारखेडा पोलीस पाटील अर्चना रमेश पाटील यांनी दिली . "
*****************************************
सर्वात यासंदर्भात मुक्ताई वार्ताला कोथळीचे पोलीस पाटील तथा पोलीस पाटील ग्राम संघटनेचे प्रसिद्धिप्रमुख संजय चौधरी यांनी माहिती दिली व मन्यारखेडा तसेच रुईखेडा पोलीस पाटील यांचे संपर्क क्रमांक दिल्याने तालुक्यात खळबळ माजविणाऱ्या वृत्ताचे खरे स्वरूप वाचकांपर्यत पोहोचण्यास मदत झाली व वेगवेगळ्या उठणाऱ्या अफवाना लगाम लावता आला .त्यामुळे मुक्ताई वार्ता तर्फे कोथळी , मन्यारखेडा व रुईखेडा पोलीस पाटील यांचे आभार !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.