Contact Banner

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची भीम जयंती घरीच राहून साजरी करण्यात आली.

फैजपूर । प्रतिनिधी फारुख शेख,

यावर्षी कोरोनाचे जीवघेणे संकट देशावर घोंघावत असताना लॉकडाऊनचा नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ जयंती घरीच राहून साजरी करण्यात आली. व शाळा, प्रशासकिय, सामाजिक, राजकीय व खासगी संस्थेत जयंतीनिमित्त विविध उपक्रम रद्द करण्यात आले. तसेच सकाळी ११ वाजता मान्यवरांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्याला उजाळा देण्यात आला. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व समिती तर्फे गोर गरीब नागरिकांना अल्पोपहार वाटप करण्यात आले व लॉकडाऊनमध्ये कर्तव्य बजावत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे यांचा सत्कार भारिप शहराध्यक्ष अमर मेढे यांनी केला.

यावेळी नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, काँग्रेस गटनेते कलीम मण्यार, हेमराज चौधरी, इरफान शेख, प्रभाकर सपकाळे, रईस मोमीन, देवेंद्र बेंडाळे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, माजी उपनगराध्यक्ष जि. पी. पाटील यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी राजनंदन मेढे, सागर भालेराव, योगीराज मेढे, चेतन मेढे, राजू वाघ, राजन मेढे, बौद्ध पंच ट्रस्टचे अध्यक्ष भीमराव मेढे, संतोष मेढे, विजय मेढे, भारिप शहराध्यक्ष अमर मेढे, पप्पू मेढे, अजय मेढे, भूषण मेढे, मुन्ना मेढे, मयूर मेढे, यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची भीम जयंती घरीच राहून साजरी करण्यात आली. यंदा कोणत्याही स्वरूपात बाहेर मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम लावून मिरवणूक काढण्यात आली नाही. भीम जयंती दरवर्षी एप्रिल ते जून महिन्या पर्यंत साजरी करण्यात येते. यावर्षी कोरोनाचे जीवघेणे संकट देशावर घोंघावत असताना लॉकडाऊनचा नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा १४ एप्रिल घरीच राहून साजरी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.