भुसावळात पुन्हा कोरोनाचा रुग्ण, सिंधी कॉलनी परिसर सील
भुसावळात पुन्हा कोरोनाचा रुग्ण,
सिंधी कॉलनी परिसर सील
भुसावळ- शहरात काल दि. २५ रोजी एका महिलेस कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. आज पुन्हा दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रुग्णाची माहिती मिळताच पोलिसांनी सिंधी कॉलनी भागात जाऊन संपुर्ण परिसर सॅनिटराईज करुन सील केला.
शहरात काल एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. याप्रकरणी महिलेच्या पतीसह मुलांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहे. यांचा अहवाल येत नाही, तोच आज दुसऱ्या दिवशी पुन्हा एक ५० वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट होऊन सिंधी कॉलनी भागात जाऊन तपासणी करण्यात आली. यावेळी प्रांत रामसिंग सुलाणे, डिवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत आदींनी पाहणी केली. संपुर्ण परिसर सॅनिटराइज करण्यात येऊन, जामनेर रस्त्यावरील सिंधी कॉलनी परिसराचे प्रवेशद्वारच सील करण्यात आले आहे. या ५० वर्षीय रुग्णास गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले होते.
सिंधी कॉलनीतील या रुग्णाचा पान मसाला विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्या परिवारात तीन भाऊ, त्यांच्या पत्नी, प्रत्येकी दोन मुले आणि आई असा मोठा एकत्र परिवार आहे. त्यामुळे या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर परिवारातील सदस्यांना वैद्यकिय तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत