बनानासिटी परिसरात फैजपूर येथे कोरोनाचा शिरकाव;परिसरात खळबळ
फैजपूर, प्रतिनिधी बननसिटी परिसरात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने निर्धास्त असलेल्या फैजपुरकरांना आज एक बाधीत रुग्ण आढळून आल्याने धक्का बसला आहे.दरम्यान, रूग्णाचा रहिवास असणाऱ्या भागात प्रशासनाने सील करण्यास प्रारंभ केला असून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आज दि १४ रोजी सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये फैजपूर येथील एक रुग्ण बाधीत असल्याचे वृत्त आल्याने शहरासह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.संबंधीत रूग्ण ही सिंधी कॉलनी भागातील महिला असून ती काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथून आल्याचे कळते.दरम्यान, महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे कळताच प्रशासनाने सिंधी कॉलनी परिसर सील करण्यास प्रारंभ केला आहे.
शहरात प्रशासनाने आजवर शहरात एकही कोरोना बाधीत होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.विशेष करून प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले हे आपल्या सहकाऱ्यांसह जनतेने लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी प्रयत्नशील होते.त्यांना महसूल, नगरपालिका, पोलीस प्रशासन , आरोग्य कर्मचारी आदी विविध खात्यांनी सहकार्य केल्याने आजवर शहरात कोरोनाचा शिरकाव नव्हता.तथापि, आज एक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने शहरवासियांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
तसेच लोकांनी घाबरून न जाता लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकताही यातून दिसून आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत