पळसे परिसरातील गावांना दिवसा वीज पुरवठा करावा विज वितरण कडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
पळसे परिसरातील गावांना दिवसा वीज पुरवठा करावा विज वितरण कडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
नाशिक प्रतिनिधि:-नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील पळसे सह बाभळेश्वर, मोहगाव, चांदगिरी, जाखोरी, शिंदे, नानेगाव, शेवगेदारणा सह इतर गावामध्ये बिबट्या ने दहशत निर्माण केली असल्याने रात्री च्या वेळी शेतात पाणी भरणे धोकादायक बनल्याने या भागात दिवसा वीज पुरवठा सुरळीत चालू करण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गायधनी यांनी केली आहे.
आज नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर आणि मानवी वस्तीत केलेले प्राणघातक हल्ले,शेतकरी बांधवांसाठी धोक्याचे ठरत आहेत,,शेतकरी बांधव रात्रीची वीज असल्यामुळे जीव मुठीत धरून शेताला पाणी पुरवठा करतात. हे शेतकरी बांधवासाठी खूप धोकेदायक आणि प्राणघातक आहे .ही गोष्ट लक्षात घेता आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे, आमदार सरोज ताई अहिरे, युवक जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम दादा कडलग* यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष संदेश टिळे, जिल्हा सरचिटणीस कुमार गायधनी राष्ट्रवादी युवक पळसे शाखा अध्यक्ष गणेश आगळे, कार्याध्यक्ष श्रीकांत टावरे, उपाध्यक्ष अभिषेक गायखे, शुभम जाधव, विशाल गायधनी या शिष्टमंडळाने विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता प्र.मा.दारोली साहेब यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली तसेच निवेदन सादर करण्यात आले त्यात शेतकरी बांधवासाठी थ्री फेज वीज पुरवठा दिवसा सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत द्यावा .म्हणजे शेतकरी बांधवांचा धोका कमी होईल .व शेतकऱ्यांच्या पिकांची पाण्याअभाव नुकसान होणार नाही अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत