कोविडं 19 रुग्णास मदतीचे हेल्पलाईन नं जाहीर
कोविडं 19 रुग्णास मदतीचे हेल्पलाईन नं जाहीर
कोव्हीड-19 या विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढलेली आहे.रुग्णाच्या अडचणी सोडविणे व त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे वॉर रुम स्थापन करण्यात आले आहे.सदर वॉर रुममध्ये जिल्हयातील नागरिकांनी/रुग्णांनी संपर्क साधणेसाठी दूरध्वनी क्रमांक 02572217193 व टोल फ्री क्रमांक 1077 कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत.सदरहू वॉर
रुममध्ये सकाळी 07.00 ते रात्री 23.00 वाजेपावेतो कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
त्यानुषंगाने कोविड-19 या विषाणुच्या आजाराबाबत जिल्हयातील जनतेस/रुग्णास काही अडचणी असल्यास त्यांनी सदरहू क्रमांकावर संपर्क करण्याबाबत मा.डॉ.श्री.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी जळगांव यांनी आवाहन केलेले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णलय, जळगांव येथे नियंत्रण कक्ष सुध्दा स्थापन करण्यात आला
असून तेथे 02572242111 हा क्रमांक कार्यान्वीत करण्यात आलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत