Contact Banner

रोझोद्यातकोरोनाचा शिरकाव एक ७० वर्षीय महिला पॉझिटिव्ह

रोझोद्यातकोरोनाचा शिरकाव एक ७० वर्षीय  महिला पॉझिटिव्ह

सावदा प्रतिनिधी  जिल्ह्यासह रावेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात रोझोदा  गावातील
दूध डेअरी जवळील ७० वर्षीय महिला घरी एकटीच रहात असून ती  दि. ८  पासुन डॉ उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये  उपचारार्थ दाखल केलेले होते  या  महिलेचा स्वाब उपचार दरम्यान घेण्यात आला होता त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून ही ७० वर्षीय महिला  रुग्ण कोरोना बाधित आढळून आली आहे.
. आता पर्यंत रोझोद्या मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता आता इथे पण कोरोनाचा  शिरकाव झाला असून रुग्ण राहत असलेल्या परिसर निर्जंतुक करण्यात आला पण प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन )न केल्याने नागरिकांत तर्कवितर्क लावले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.