Contact Banner

अमेरिका : लस लवकर बनवण्याच्या अतिघाईने जोखिम वाढते ,65 वर्षपूर्वी 70 हजार दिव्यांग


अमेरिका : लस लवकर बनवण्याच्या अतिघाईने जोखिम वाढते, 65 वर्षपूर्वी 70 हजार दिव्यांग 

डॉक्टरांचा इशारा:-फायदा कमी धोका वाढन्याचीच भीती जास्त


न्यूयॉर्क:- कोरोना विषाणूच्या लसीवर जगभरात चाचणी सुरु आहे लोकांना वाटते की लस मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगची गरज संपवून टाकणे आणि ते पहिल्यासारखे आयुष्य जगु शकतील. जगभरातील शास्त्रज्ञ लवकरात लवकर लस तयार करण्यात व्यग्र आहेत, मात्र  वैद्यकीय तज्ञ या घाईमुळे चिंतीत आहेत वेळे आधी लस आणणे नुकसान करू शकते. असा इशारा तज्ञांनी दिला आहे 1955 मध्ये ओरिजिनल साल्स पोलिओची लस बनवण्यात घाई करण्यात आली होती.मात्र यामुळे चांगले परिणाम दिसले नाहीत उलट मोठ्या प्रमाणात लस उत्पादनात चूक झाल्याने 70 हजार मुले पोलिओच्या तावडीत सापडले होते 10 मुलांचा मृत्यु झाला होता डॉ.ब्रिट टोजन यांच्यानुसार यामुळे कोरोना विषाणू लसीबाबत लोकांमध्ये शंका वाढु शकते, तसेच डॉक्टरांवरील विश्वासही कमी होऊ शकतो,ट्रोजन सांगतात की प्रत्येकाला लस सिल्व्हर बुलेट सारखी हवी आहे, जी संकटातुन बाहेर काढेल मात्र शास्त्रीयदुष्ट्या तयार होण्याआधी लस आणण्यासाठीचे राजकिय आणी सामाजिक दबावाने गंभीर परिणाम होऊ शकतात तज्ञ लस प्रभावी होण्याबाबतही चिंतीत आहेत कोणतीही लस रुग्णाचा 100%आजार बरा करत नाही. जसे फ्लूवरील लस ज्यांना ही लस देण्यात आली त्यांना काही त्रास होऊ शकतो लस विकसित करण्यात अग्रग्रण्य असलेले, डॉ.पोल ऑफ अपसेट यांच्या नुसार चाचणी  घेण्यात येत असल्याने लसी पेक्षा एक अनेक गंभीर संसर्गाची प्रकरणे रोखण्यात मदत करू शकते. एवढेच नव्हे तर गंभीर आजार रोखण्यात 50% परिणामकारक लस देखील स्वीकारले जाऊ शकते तसेच जोपर्यंत या लसीचे लाखो लोकांवर चाचणी केले जात नाही, तोपर्यंत डॉक्टर हे सांगू शकत नाही की ती सुरक्षित परिणामकारक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.