जळगांव नविन जिल्हाधिकारी पदी मा.श्री. अभिजित राऊत यांची नियुक्ती होणार
जळगांव नविन जिल्हाधिकारी पदी मा.श्री. अभिजित राऊत यांची नियुक्ती
सावदा (प्रतिनिधी)। जळगाव शहरासह
महाराष्ट्र मध्ये कोरोना
रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे सवञ संतापाची लाट उसळली होती. त्यातच जिल्हा रुग्णालयात कोरोना रूग्ण ८० वर्षीय नेहते नामक वृद्ध महिलेचा मृतदेह शौचालय मध्ये
आढळून आल्याने खळबळ उडाली होती या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ रुग्णालयातील दोषींवर कार्यवाही केली. तसेच जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे हे देखील कोरोना ला आळा घालण्यात अपयशी ठरल्याने त्यांची उचल बांगडी करुन 2013 बॅच चे आय.ए.एस. अधिकारी असलेले अभिजित राऊत यांनी आज जळगांव चे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत