Contact Banner

कृषि पदवीधर संघटनेची युवती आघाडी स्थापन उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कु गुंजन कुरकुरे

कृषि पदवीधर संघटनेची युवती आघाडी स्थापन  उत्तर महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्षपदी कु गुंजन कुरकुरे
सावदा प्रतिनिधी
१६ जून रोजी कृषि पदवीधर संघटनेने राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी बांधवांचे संघटन करत असतानाच युवती आघाडी कृषि कन्यां साठी स्थापन केली आहे. कृषि पदवीधर च्या कोअर कमिटी मधील मंगल कडूस पाटील यांच्या अनुमोदना नंतर कु. गुंजन कुरकुरे यांचे नाव  उत्तर महाराष्ट्र युवती  प्रदेशाध्यक्ष म्हणून निश्चित करण्यात आले आहे.
राज्यातील कृषि विद्यार्थी संघटीत करत असताना युवती विद्यार्थीनी यांचे प्रश्न दुर्लक्षित करुन चालणार नाही, त्यांना संघटीत केले पाहिजे. कृषि कन्या संघटीत होण्याची ही राज्यात पहीली वेळ आहे, उत्तर महाराष्ट्र पातळीवर मी युवती संघटीत करुन महाराष्ट्रातील प्रत्येक कृषि महाविद्यालयातील युवतींचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे नवनिर्वाचित युवती अध्यक्ष गुंजन कुरकुरे यांनी सांगितले आहे.
कृषी पदवीधर संघटना ही शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करत आहे आणि शेतकर्यांची कोणतीही अडचण आम्ही या संघटने मधून सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन संघटनेने दिले आहे.
युवती आघाडी ही संकल्पना सौ मंगल कडूस पाटील यांनी मांडली असुन, संघटनेच्या सौ भाग्यश्री ताई पाटील, सौ लक्ष्मी ताई मोरे अशा महीला कृषि उद्योजकांच्या माध्यमातून फक्त संघटनच नाही तर महीला भगिनी च्या करिअर ला नवी झळाळी देण्या साठी कृषि पदवीधर संघटना ची युवती आघाडी ही उपक्रम शील संघटन असणार आहे अशी माहिती भावना गायके कोअर कमिटी सदस्य यांनी दिली.   नंदुरबार जिल्हा  युवती अध्यक्ष पूजा जगताप व इतर पदधिकारी चारुमती आघाव, प्रियांका खैरनार, जागृती पाटील, अश्विनी पाटील,तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष नेहा पांडे व इतर पदाधिकारी  संजीवनी भालेराव, भावना ओतरी , तेजस्विनी पाटील आणि शहादा तालुका अध्यक्ष नेहा सोनवणे आणि  चोपडा अध्यक्ष  काजल पाटील यांची निवड  उत्तर प्रदेश पातळीवरील पदाधिकारी म्हणून झाली आहे. पुणे येथील आगामी युवती सोहळ्यात सर्व पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे भावना गायके यांनी सांगितले. कृषि कन्या चे हे संघटन आता कृषि क्षेत्रातील चर्चे चा विषय ठरतो आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.