Header Ads

मुक्ताईनगर माजी सभापतींची हत्या प्रकरणी : तिघा आरोपींना अटक

मुक्ताईनगर माजी सभापतींची हत्या प्रकरणी : तिघा आरोपींना अटक 

(मुक्ताईनगर प्रतिनिधी):-मुक्ताईनगर पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी : अटकेतील आरोपींमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याचा समावेश आहेत
 मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती तथा कुर्‍हाकाकोडा येथील रहिवासी डी.ओ.पाटील यांची गावातील पेट्रोल पंपाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत एका अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. या हत्येचा उलगडा करण्यास मुक्ताईनगर पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला संयुक्तरीत्या यश आले आहे. तीन आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुपारी देवून ही हत्या घडवून आणण्यात आली असून आता सुपारी किलरचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

संयुक्त कारवाईत आरोपींना अटक
कुर्‍हाकाकोडा गावात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ डी.ओ.पाटील हे झोपेत असतानाच एका आरोपीने त्यांची गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती तर आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. जळगाव गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलिसांना संयुक्तरीत्या या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.