Contact Banner

शिवसेनेच्या पुढाकारातुन नवीन अत्यावश्यक सेवांची सुसज्ज 85 रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत


शिवसेनेच्या पुढाकारातुन नवीन अत्यावश्यक सेवांची सुसज्ज 85 रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत 

(मुंबई प्रतिनिधी)शिवसेनेच्या पुढाकारातून ८५ रूग्णवाहिका नागरीकांच्या सेवेत येणार असून यातील पहिल्या टप्प्यामधील २४ रूग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.


युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने ५५ रूग्णवाहिका CSR च्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला देण्यात येत आहे. यातील १२ रूग्णवाहिका महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यासाठी झी समूह, महिंद्रा अँड महिंद्रा कं, दिपक फर्टिलायझर, श्री.आनंद राठी यांचे सहकार्य लाभले.

त्याचप्रमाणे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुंबई आणि ठाणे या शहरांसाठी ३० रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापैकी ५ रूग्णवाहिका आयसीयु व व्हेंटीलेटर या सुविधांनी सुसज्ज आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.