Contact Banner

या परीक्षा पुढे केल्या राज्यसरकारने, कोणत्या आहेत त्या परीक्षा..?

या परीक्षा पुढे केल्या राज्यसरकारने, कोणत्या आहेत त्या परीक्षा..?

मुंबई प्रतिनिधि:- राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने होणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

‘राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच CET- सेलद्वारे प्रत्येक वर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव पहायला मिळतोय. राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत यांच्या सांगण्यानुसार, पालक तसेच अनेक विद्यार्थ्यांद्वारे या सर्व प्रवेश परीक्षा पुढे ढकल्याव्यात यासंदर्भात सतत मागणी केली जात होती. सध्या राज्यभरात कोरोनाने थैमान घालतंय, हा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय.

परिक्षा रद्द केल्याने या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील. तर नुकतंच दोन दिवसांपूर्वीच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.