महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रावेर तालुक्यातील हॉस्पिटल समाविष्ट करावे - युवासेना विभाग प्रमुख तुषार कचरे
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रावेर तालुक्यातील हॉस्पिटल समाविष्ट करावे - युवासेना विभाग प्रमुख तुषार कचरे.
(ऐनपुर प्रतिनिधी):-
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यासाठी तालुक्यातील नागरिकांना ,सर्वसामान्य जनतेला आरोग्यविषयक तत्काळ व मोफत उपचार करता यावे या करिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आपल्या जिल्ह्यात 33 हॉस्पिटल उपलब्ध करून दिलीत पण तालुक्यात स्थानिक रावेर तालुक्यातील नागरिकांना सादर योजने अंतर्गत हॉस्पिटल उपलब्ध नसल्याने इतरत्र जावं लागेल व रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतनाही..
त्यामुळे आज माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे , आरोग्यमंत्री राजेशजी टोपे व मुक्ताईनगर मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय चंद्रकांतभाऊ पाटील त्यांना ई-मेल द्वारे निवेदन देऊन रावेर तालुकासाठी योजनेमध्ये रावेर तालुक्यातील स्थानिक हॉस्पिटल समाविष्ट करावे जेणेकरून रावेर तालुक्यातील सर्वसामान्य जनता, गोरगरीब मायबाप, शेतकरी, सर्वसाधारण नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
याबाबत आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्यासोबत भ्रमणध्वनी वरून बोलणे झाले असता लवकरचं रावेर तालुक्यातील नागरिकांना सदर योजनेचा लाभ घेता यावा या करिता सदर योजनेतून लवकरचं रावेर येथील हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात येईल अस यावेळी बोलताना अश्वस्त केले...!!
आज दुपारी मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनाची दखल घेतली असून संबंधित विभागात पुढील कारवाईसाठी पाठवला गेला आहे या बाबतचा ई-मेल प्राप्त झालेला असून , मला आशा आहे की लवकरच आपल्या रावेर तालुक्यातील नागरिकांसाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत रावेर येथील हॉस्पिटल समाविष्ट होईल...
असे युवासेनेचे तुषार कचरे यांनी लेवाजगत यांच्याशी बोलतांना सांगितले...!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत