चिनावल दोन मयताचा अहवाल पॉझिटिव्ह ,रुग्ण संख्या झाली ३
चिनावल दोन मयताचा अहवाल पॉझिटिव्ह ,रुग्ण संख्या झाली ३
सावदा प्रतिनिधी चिनावल येथे आज दि ३ रोजी आलेल्या कोरोना तपासणी अहवालात गावातील पुन्हा एक ७०वर्षीय मृत रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.बाधित रुग्णांचा काल मृत्यू झाला होता सदरील रुग्ण गरीबी हटाव भागातील रहिवासी आहे. तर सेंट्रल बँक जवळील रहिवाशी ६५ वर्षीय मयत पण बाधित असून, याआधी सुद्धा गावात एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आला होता. सदरील वृत्तास स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ.विजया झोपे व डॉ.ठाकुर यांनी दुजोरा दिला आहे. रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून सील करण्यात आला आहे.
गावातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३झाली आहे. त्यातील २ मयत व एक पुरुषावर उपचार सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत