सावद्यात ३महिलांसह एक पुरुष कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह शहरात जिल्हाधिकाऱ्यांची भेट
सावदा लेवाजगत वृत्त सेवा:- शहरात काही दिवस पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या एकाच घरातील ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सावदा येथील एका ट्रान्सपोर्ट चालक कोरोनाबाधित आढळला होता. त्यांच्या संपर्कातील व घरातील व्यक्तींचे स्वॅब घेवून फैजपूर रोड वरील ट्रान्सपोर्ट वरती क्वारंटाईन करण्यात आले होते. आज दि ५ रोजी दुपारी त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी एकाच कुटंबातील ४ अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. त्यात ३ महिला व १ पुरुषाचा समावेश आहेत. त्यातील महिलांचे वय ३५,३७,२० व पुरुषाचे वय २५ वर्षीय रुग्णांचा समावेश आहेत.
जिल्हाधिकारी यांची सावद्यात भेट
कोरोना रुग्णाची वाढती संख्या बघता आज प्रतिबंधित क्षेत्र व आयसोलेशन कक्ष ,व घरातच विलीगकरण असलेल्या भागास जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, प्रांत अजित थोरबोले
तहसीलदार उषाराणी देवगुणे , सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ मुख्याधिकारी सौरभ जोशी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे
यांनी आज संयुक्तिक भेट दिली त्यांचे सोबत सावदा सर्कल शरीफ तडवी, तलाठी ईश्वर तायडे यांनी आज प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या या भागाची पाहणी केली व घरातच विलीगिकरण असलेले रुग्ण यांच्या ठिकाणाची ही पाहणी केली तसेच विलीगिकरण कक्षात असलेल्या रुग्णांनाही भेटी दिल्या आज कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत