सावद्याचा पुत्र सोहम पाटील 'आजोबा' चित्रकला स्पर्धेत प्रथम
सावदा प्रतिनिधी
अलिबाग येथील आजोबा संस्था आयोजित भव्य आजोबा चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात इयत्ता चौथी ते सातवी सावदा येथील रविवार पेठ येथील रहिवासी शेतकरी कुटुंब मोतीराम पाटील यांचे नातू प्रथम सोहम दीपक पाटील ह.मु.उल्हासनगर, द्वितीया ओम राजेंद्र परदेशी पुणे, तृतीय तन्मय जयेश धारगळकर दादर व गट ब इयत्ता आठवी ते दहावी प्रथम दिशांत जगदीश जाधव पालघर ,एटीएस साहिल उत्तम दूरी ठाणे, द्वितीय किरण नितीन वारटाक विरार तृतीय अद्वय संदीप मुंडे गोरेगांव अशा सर्व विजेत्यांची नावे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणताही प्रसंग या विषयावर चित्र काढण्यास स्पर्धकांना विषय देण्यात आला होता ,या चित्रकला विषयात ऑनलाइन सादरीकरण करून भाग घेऊन स्पर्धकांनी विजय प्राप्त केला आहे.
अलिबाग येथील आजोबा संस्थेचे स्पर्धेचे आयोजक यांनी सांगितले की मुले घरी लॉक डाऊन असल्याने घरीच आहे त्यांना आपल्या कला सादर करण्याचा हा उपक्रम व मुलांना आपली कला सादर करण्याची एक सुवर्णसंधी आजोबा तर्फे देण्यात आली होते ६०० स्पर्धक यांनी सहभाग घेतला असे अयोजकांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत