Header Ads

Header ADS

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस.टी.महामंडळाच्या मालवाहतूक एस.टी.ट्रक सेवाला आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे हस्ते मुक्ताईनगर येथे सुरुवात...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस.टी.महामंडळाच्या मालवाहतूक एस.टी.ट्रक सेवाला आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे हस्ते मुक्ताईनगर येथे सुरुवात...

महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळख असलेली एस.टी. प्रवाशी वाहतुकीसह मालवाहतूकीच्या नवीन सेवेसाठीही सज्ज...

 मुक्याईनगर लेवाजगत वृत्त :-  कोरोना  महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच संसर्ग वेगाने पसरु नये यासाठी प्रवाशी वाहतुक सेवेच्या अग्रस्थानी असणार्या  एस.टी.बसच्या प्रवासी वाहतुकीवर अनेक निर्बंध लावण्यात आलेले आहे. या परिस्थितीत खोळंबलेल्या बस सेवेला उभारी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने आजपासून एस.टी. मालवाहतूक सेवा सुरू केलेली आहे. या मालवाहतूकीसाठी एस.टी.ला ट्रक सारखे स्वरुप (डिझाईन) देवून तयार करण्यात आलेले आहे. या सेवेचा शुभारंभ आज 9 रोजी सकाळी 11 वाजता मुक्ताईनगर येथील बस आगाराच्या आवारात आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे हस्ते करण्यात आला. आज पहिल्या मालवाहू ट्रक (बसला) यावेळी आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचेकडून हिरवा झंडा दाखवून   एस.टी.ट्रक मुक्ताईनगर आगारातून सोडण्यात आला.या सेवेचा प्रारंभ करतांना एस.टी. कामगार सेनेचे पदाधिकारी तथा चालक अनिलभाऊ सपकाळे हे रा.प.म.चा ट्रक क्रमांक एम. एच. २० डी ८६४१ घेऊन बोदवड ते जळगांव धान्य वाहतुकीसाठी रवाना झाले. यावेळी आगार प्रमुख:- एस. बी.साठे स्थानक प्रमुख:-अनिल बावस्कर व इतर रा.प.म कर्मचारी तसेच शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, वसंत भलभले, आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे स्विय्य सहाय्यक संतोष कोळी,  दिपक पवार, शुभम शर्मा, सुनिल पाटील (तरोडा) स्वप्निल श्रीखंडे, सागर सनांसे, गोलू मुर्हे, विठ्ठल पाटील उपस्थित होते. 

मुक्ताईनगर आगारातून माल वाहतूक व शासकीय रेशनिग व इतर शासकीय मालाची  वाहतुक एस.टी.ट्रकने करण्याची परवानगी मिळावी या आशयाचे निवेदनही यावेळी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे पदाधिकारी यांनी आ. चंद्रकांतभाऊ पाटील यांना दिले यावेळी अनिल भाऊ सपकाळे जेष्ठ पदाधिकारी एस.टी.कामगार सेना तसेच आजचे ट्रक चालक,
अध्यक्ष:-सुनील भाऊ चौधरी
सचिव:-बाबुराव महाले
उपाध्यक्ष:-आर सी शिरगोळे
कोषाध्यक्ष:-प्रमोद गोसावी
प्रसिद्धी सचिव:-बी बी वाव्हळे
पदाधिकारी:-रमेश जाधव,नितीन भालेराव,एस पी घोडेस्वार, सुनील दामोदरे, एन जे एदलाबादकर,आकाश जयकर उपस्थित होते.
जय महाराष्ट्र!... संतोष कोळी (आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे स्विय सहाय्यक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.