Header Ads

Header ADS

उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातउद्यापासून कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचार

उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात
उद्यापासून कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचार

जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा,सौजन्य लेवाजगत) : कोरोना (COVID 19) विषाणूबाधित व  संशयित रुग्णांवरील उपचाराकरीता जळगाव येथील गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 400 बेडस अधिग्रहित करण्यात आले आहेत. यात 28 आयसीयू व 150 ऑक्सिजन सुविधा असलेल्या बेडसचा समावेश आहे. या रुग्णालयात 11 जून 2020 पासून संबंधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे सध्या उपचार घेत असलेल्या भविष्यात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचाराकरीता गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडिकल अँड जनरल हॉस्पिटल, जळगाव हे वैद्यकीय उपचारांसाठी अत्यावश्यक बाब म्हणून पुढील आदेश येईपर्यंत अधिग्रहित करण्यात आले असून ते डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. या महाविद्यालयातील 400 बेडस डेडिकेटेड हॉस्पिटल करिता अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. तसेच 8 जून 2020 रोजी जळगाव जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालय व्यवस्थापनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत या योजनेत समाविष्ट असणाऱ्या सर्व आजारांवर उपचार घेण्याची मुभा सर्व नागरिकांना शासनातर्फे उपलब्ध करून दिल्याबाबत संबंधित रुग्णालयांना अवगत केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व नोडल अधिकाऱ्यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट देवून पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना (कोविड 19 बाधित, संशयित रुग्ण वगळून) डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपलब्ध असलेल्या उपचाराच्या अत्यावश्यक सेवा 7 जून 2020 रोजीच्या आदेशाच्या पूर्वस्थितीप्रमाणे सुरू ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रथमत: तेथील 400 बेडस हे कोविड बाधि, संशयित रुग्णांकरीता उपलब्ध करुन देणे आवश्कय आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे. 
या रुग्णालयात वरील नमूद केलेले 40 0बेडस गवळता उपलब्ध असलेले अन्य बेडस, अन्य अत्यावश्यक सेवा, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध होत असलेल्या सर्व सुविधा तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच अन्य रुग्णांसाठी (कोविड 19 विषाणूमुळे बाधित, संशयित रुग्ण वगळून) उपलब्ध असतील. तसेच कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक पीपीई कीट, एन- 95 मास्क आदी शासनाच्या धोरणाप्रमाणे रुग्णालय व्यवस्थापनाने खरेदी करावेत. त्याचा तपशील जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रमाणित केल्यावर जिल्हा प्रशासनाकडून या खर्चाची भरपाई करण्यात येईल. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाने सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड बाधित रुग्णांवर करावयाचे उपचार याविषयी प्रशिक्षण द्यावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.