Contact Banner

चिनावलात केळी गृप दिवाणजी कोरोना बाधित !

चिनावलात  पुन्हा एक पुरुष   कोरोना बाधित !
 सावदा प्रतिनिधी  
आज  दि ८ रोजी आलेल्या कोरोना तपासणी अहवालात गावातील  चिंचवाडा   परिसरातील .  एका ६३  वर्षीय  केळी गृप दिवानजी  या पुरुषांचा अहवाल कोरोना बाधित आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. या पुरुषाचे स्वाब खाजगी प्रयोगशाळा पाठवण्यात आले होते  त्याचा  अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे
 रुग्ण राहत असलेला परिसर प्रशासनाकडून सिल करण्यात आला आहे. तर काल गावातील २४ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण आता आज आलेल्या अहवालामुळे गावात चिंता पसरली आहे.सदरील वृत्तास स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.