Contact Banner

विद्यार्थी वाचवा मोर्चाच्या रावेर तालुका संपर्क प्रमुख पदी आकाश महाजन तर फैजपुर शहर प्रमुख पदी प्रतीक वारके.

विद्यार्थी वाचवा मोर्चाच्या रावेर तालुका  संपर्क प्रमुख पदी आकाश महाजन तर फैजपुर शहर प्रमुख पदी प्रतीक वारके.

प्रतिनिधी सावदा-
     विद्यार्थी वाचवा मोर्चा ही एक अराजकीय संघटना महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन  करण्यात आली असून संघटनेची  खान्देश नाशिक विभागाची कार्यकारिणी  जाहीर करण्यात आली.
        संघटना महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी हिताचे  काम करणार असून   कार्य करीत आहे.
  संघटनेच्या  खान्देश उपविभाग प्रमुख पदी वैभव देविदास तराळे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली खान्देश मधील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे पदाधिकारी खंबीर आहेत असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
  जळगाव जिल्ह्यासाठी विवेक युवराज महाजन यांची जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवळ झाली असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने अडचणी च्या वेळी नेहमीच उभे राहू असा विश्वास दर्शविला आहे.  य रावेर तालुका सम्पर्क प्रमुख (ग्रामीण) पदी आकाश महाजन यांची निवड करण्यात आली असून   व प्रतीक वारके यांची फैजपुर शहर प्रमुख म्हणून निवड झाली आहे.
   विद्यार्थी प्रश्नांचे राजकीय पक्ष राजकारण करत असतानाच या अराजकीय चळवळीने नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल.सर्व जिल्ह्यात राजकीय व विद्यार्थी संघटनाकडून  आकाश महाजन व प्रतिक वारके यांचे अभिनंदन होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.