Contact Banner

अयोध्येत भूमीपूजनासाठी मोदींच्या येण्याची प्रतीक्षा

अयोध्येत भूमीपूजनासाठी मोदींच्या येण्याची प्रतीक्षा

अयोध्या वृत्त:-सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता रामलल्लाचे दर्शन सहजपणे होते परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावे आणि भूमिपूजन करून भव्य मंदिराच्या निर्णयकार्याचा आरंभ करावा अशी आमची इच्छा आहे वासुदेव घाटावरील मोहन मिश्र यांच्याप्रमाणेच अयोध्येतील प्रत्येकाचा तोंडी हीच गोष्ट आहे सात जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रावणात भूमिपूजन होणार नसल्याने भूमिपूजन कधी होणार यायाची सर्वांना उत्सुकता आहे  28 जून रोजी योगी आदित्यनाथ अयोध्येत आले व त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थश्रेत्र ट्रस्टसंबंधित पदाधिकाऱ्यासमवेत बैठक घेतल्या होते त्यांच्या दुसर्‍या दिवशी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नूत्यगोपाल दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून तात्काळ भूमिपूजन करण्याचा आग्रह केला 
मंदिर निर्माण संबंधात महंत नूत्यगोपालदास म्हणाले त्यांच्यासाठी सर्व तयारी आहे लवकरच निर्माण सुरू होईल भूमिपूजन श्रावणातही केले जाऊ शकते असे नूत्यगोपालदास यांचे उत्तराधिकारी कमल नयन दास यांनी सांगितले श्रावनात सुरू झालेले कार्य पूर्ण होते मंदिर जुना मॉडेल नुसार होणार आहे 2022 रामनवमीच्या दिवशी भगवान स्थायी गर्भगृहात विराजमान असावेत अशी आमची इच्छा आहे असे त्यांनी सांगितले अयोध्येतील राजपरिवाराचे प्रमुख व ट्रस्टचे सदस्य बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा म्हणाले भगवान त
टेंटमधुन अस्थायी मंदिरात आले आहेत ही आमच्यासाठी मोठे गोष्ट आहे 67.7 एकर जमिनीवर एक मोठ्या भागात तर अनेक वर्षापासून कोणी गेलेलेदेखील नाही त्यालाही नेटके करावे लागणार आहे रामजन्मभूमीवर गर्भगृहाचे नियोजीत ठिकाणाचे सपाटीकरण झाले जन्मभूमीपासून तीन किलोमीटर अंतरावर श्रीराम जन्मभूमी न्यास कार्यशाळेत दशकांपासून नक्षीकाम व तासलेल्या शेळ्यांच्या साफसफाईचे काम वेगाने  केले जात आहे सध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे कार्य संचालक चे मुख्य ठिकाण राम कचरी येथील कॅम्प कार्यालयातून पाहिले जाते  ट्रस्टचे सरचिटणीस व मंदिरा निर्णयात महत्त्वाची भूमिका निभावणारे चंपत राय म्हणाले संपूर्ण 67 एकर जमीन  ट्रस्टला सोपविण्यात आली आहे त्यानंतर मार्चमध्ये 12 .60 कोटी रुपयांची एफडीदेखील ट्रस्टच्या नावे आहे गर्भगृहाचे जमिनीवर सपाटीकरनाच्या काम करताना शिवलिंग तसेच नक्षीदार खांब आढळून आले दरम्यान मंदिर 140 फूट रंद 268.5 फुट लांब.128 फोट उंच असेल श्रीराम जन्मभूमी न्याय कार्यशाळेचा 6 लोक.शिळांची सफाईचे काम करत आहेत कार्यशाळेचे सुपरवायझर अन्नभाई  सोमपुरा म्हणाले तीन ते चार महिन्यात शिळांची सफाई पूर्ण होईल सध्या पहिला मजल्यासाठी शेळांची रचना करण्यात आली आहे संपूर्ण मंदिराच्या उभारणीसाठी पाच वर्षाचा कालावधी लागू शकतो एक ते दीड वर्षे तर कार्यशाळेतून शिळा पोहोचणे व पायाभरणीच्या कामासाठी लागू शकतो 2022 मध्ये एक मजला उभा राहू शकतो रामलल्लाचे पुजारे प्रेम त्रिपाठी लाँकडाऊनदरम्यान दोन चार लोकच येत होते परंतु 8 जूननंतर संख्येत वाढ झाली आता दिवसभरात एक हजारावर भाविक दर्शनासाठी येत आहेत सायंकाळी शेजाऱ्यांकडुन येणारे रामजन्मभूमी-बाबरी प्रकरणातील मुख्य पक्षकार इक्बाल अन्सारी म्हणाले आता नवा वाद होऊ नये एवढेच वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.