Contact Banner

दिल बेचारा, सुशांतसिंग राजपूत चा शेवटचा चित्रपट लवकरच होतोय रिलीज

दिल बेचारा (Dil Bechara), सुशांतसिंग राजपूत चा शेवटचा चित्रपट लवकरच होतोय रिलीज

       लेखक जॉन ग्रीन यांनी लिहिलेल्या “द फॉल्ट इन अवर स्टार्स” या सर्वोत्कृष्ट विक्रेत्या कादंबरीवर आधारित, दिल बेचारा (Dil Bechara)  हा सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट असून अभिनेत्री संजना सांघी यांचा मुख्य भूमिकेतला पहिला चित्रपटही आहे.
     मुकेश छाबरा दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत आणि संजना सोबतच स्वस्तिक मुखर्जी, सैफ अली खान, जावेद जाफरी, मिलिंद गुनाजी, आणि साहिल वैद्य हे मुख्य भूमिकेत बघायला मिळतील
सोमवारी ट्विटरवर दिल बेचारचा ट्रेलर शेअर करताना संजना सांघीने लिहिले, "आम्ही आपल्या सुशांत ची खूप आठवण काढतो तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद ."

दिल बेचारा या चित्रपटाने काल ट्रेलर विडिओ रिलीज झाला आणि मार्वल स्टुडिओच्या 'अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर' ला हरवून जगातील सर्वाधिक पसंतीचा व्हिडिओ बनला.

'दिल बेचरा'ला यूट्यूबवर एका दिवसात तब्बल 4.8 दशलक्ष लाईक्स मिळाल्या


   


ट्रेलर रिलीजच्या एक दिवस आधी, संजना सांघी यांनी "Pre Trailer glitter" अनुभवल्याबद्दल ट्विट केले:

 "मला आधी कुणी कधी सांगितले नाही की "Pre Trailer Glitter" कसे वाटते! माझे पोट थरथर कापत आहे आणि आशा आहे की आपण सर्वजण आमच्याबरोबर असाल." "मला माहित आहे की तो सुद्धा आहे."

  चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर 9 जुलै 2018 रोजी रिलीज करण्यात आले होते ज्यात एका बाजूला बसच्या वर बसलेले दोन कलाकार व मागील बाजूस ऑक्सिजन सिलेंडर चे चित्रण आहे. सदर चित्रपट ‛द फॉल्ट इन अवर स्टार्स’ (२०१४) हॉलिवूड चित्रपटाचा रीमेक असून या चित्रपटाचे नाव किझी और मन्नी होते ते बदलून दिल बेचारा असे करण्यात आले.

८ मे २०२० रोजी थिएटर मध्ये रिलीज होण्याचे ठरले होते, परंतु कोरोनाव्हायरस या साथी च्या आजाराममुळे
त्याला उशीर झाला,

२५ जून रोजी डिस्नी + हॉटस्टार ने घोषणा केली की हा चित्रपट डिजिटली रिलीज करण्यात येईल व डिस्नी + हॉटस्टार च्या सदस्यांना व सदस्य नसलेल्या जनतेला सुद्धा हा चित्रपट २५ जून रोजी डिस्नी + हॉटस्टार  च्या अँप वर बघता येईल


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.