Contact Banner

फैजपूर शहरात नाभिक समाजाचा लॉकडाऊन

फैजपूर शहरात नाभिक समाजाचा लॉकडाऊन

फैजपुर प्रतिनिधि
फैजपूर शहरात सलून व्यवसाय करण्याची प्रशासनाने परवानगी दिली असता, घालून दिलेल्या अटींमध्ये दाढी करू नये तथा त्वचेसंबंधी कुठलेही काम करू नये, असा आदेश असतांना नागरिकांकडून दाढी किंवा तत्सम काम करण्यास जोर दिला जात आहे, त्यानुसार सलून व्यवसायिकाने विरोध केला असता त्याच्याशी हमरी तुमरी केली जात आहे, म्हणून नाभिक समाजाच्या सोशल डीस्टन्सिंग चा वापर करून झालेल्या बैठकीत दि. ०५ जुलै २०२० पासून संपूर्ण व्यवसाय न करण्याचा निर्णय घेण्यात आला. जर सलून व्यवसायिकास घरी बोलावून काम करतांना आढळल्यास त्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी प्रशासनास विनंती करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.