Contact Banner

50 बेडच्या वाढीव कक्षासह 10 बेडचा आयसोलेशन कक्ष ,सुविधा येत्या 8 दिवसात उभारण्यात येणार-आमदार चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर शहर  तीन दिवस कडकडीत बंदसह जनता कर्फ्युचा निर्णय

  (मुक्ताईनगर प्रतिनिधि):- मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यातच आज दहा रुग्णांचे अहवाल पाॅझीटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असल्याने आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाची तात्काळ आढावा बैठक घेण्यात आली. यात वाढत असलेल्या रुग्णांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व काही निर्णय घेण्यात आले. शहरातील शीट फार्म एरिया पूर्णपणे सील करण्यात यावा.तसेच याठिकाणी असलेल्या दाट वस्तीतील प्रत्येक नागरिकांचा परिसरात सर्वे करून स्वॅब घेण्यात यावे, तसेच दोन दिवसानंतर रविवार,सोमवार व मंगळवार असे तीन दिवस कळकळीचा जनता कर्फ्यू म्हणून तीन दिवस गाव बंद ठेवावे.शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वतःची व परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे. अशी ही जनजागृती प्रत्येक नागरिकाने करावी, कोरोना सेंटर विषयी असलेल्या नागरिकांच्या तक्रारी ही यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोविड सेंटर संबंधी समस्या जाणून घेतल्या.त्याप्रमाणे अत्याधुनिक आयसोलेशन कक्ष येत्या आठ दिवसात उभारणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या आढावा बैठकीत सांगितले त्यात 50 बेडच्या वाढीव कक्षासह दहा बेडचा आयसोलेशन कक्ष तसेच या कक्षा करीता लागणारी अत्याधुनिक सामुग्री जसे व्हेंटीलेटर,डिजिटल एक्स-रे मशीन  अशा सुविधा येत्या आठ दिवसात अत्याधुनिक साधनसामुग्री सह आयसीयु कक्ष उभारण्यात येणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.प्रसंगी तहसिलदार शाम वाडकर,पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, नगराध्यक्ष नजमा तडवी,तालुका वैद्यकीय अधीक्षक योगेश राणे,शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई,अफसर खान,गोपाळ सोनवणे,जाफर अली,शकील सर,राजेंद्र हिवराळे,दीपक पवार,वसंता भलभले,प्रफुल्ल पाटील,शुभम शर्मा,स्वीय सहायक प्रवीण चौधरी व संतोष कोळी,उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.