जिल्ह्यातील चिंता वाढतेय, कोरोना बाधीतांचा आकडा पाच हजारांच्या पार !
जिल्ह्यातील चिंता वाढतेय , कोरोना बाधीतांचा आकडा पाच हजारांच्या पार !
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होण्यास तयार नसून आज नवीन २०७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहे. तर आजच्या आकडेवारीमुळे जिल्ह्यात आजवर कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांची संख्या ही पाच हजारांच्या वर गेले आहे. तर अमळनेरात तब्बल ३९ रूग्णांचा समावेश असल्याची माहिती संध्याकाळी अहवालात समोर आली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे.
यानुसार आज जिल्ह्यात एकूण २०७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.यात सर्वाधीक ३९ रुग्ण हे अमळनेर शहरातील आहेत.याच्या खालोखाल जळगाव शहर- २२, पारोळा-१;पाचोरा -१०, चाळीसगाव-३, रावेर-३०;बोदवड-६, जळगाव ग्रामीण-७, चोपडा १८, भुसावळ-८;भडगाव-१;धरणगाव- २३;यावल-३;एरंडोल-१८;जामनेर-१, मुक्ताईनगर-१९ आणि अन्य जिल्ह्यातील-१ अशी रूग्णसंख्या आहे.
दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५ हजार १० इतका झालेला आहे.यातील २९८३ रूग्ण बरे झाले आहेत.सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १२५० रूग्ण उपचार घेत आहेत.जिल्हा डेडीकेटेड कोविड रूग्णालयात ५१ तर कोविड रूग्णालयात ४२५ रूग्ण उपचार घेत आहेत.तर आज आठ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवर कोरोनाच्या बाधेमुळे मृत झालेल्यांची संख्या ३०१ इतकी झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ व अमळनेरात सध्या सक्तीचा लॉकडाऊन सुरू आहे.यात जळगाव मध्ये दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत चालली असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे.आज अमळनेरातही रूग्ण संख्येचा स्फोट होऊन तब्बल ३९ पॉझिटीव्ह पेशंट आढळून आले आहेत.
अमळनेर मध्ये आधीही मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले होते.पण मध्यंतरी हा तालुका कोरोनामुक्त झाला होता.आता मात्र पुन्हा येथे संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.याच प्रमाणे रावेरातही आता सातत्याने रुग्ण वाढतांना दिसत आहेत.धरणगाव तालुक्यातही संसर्ग वाढीस लागलेला आहे.यातील वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची व्याप्ती वाढल्याचे आजच्या आकडेवारीतून सिद्ध होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत