मंजिरी धुरी यांची विद्यार्थी भारतीच्या राज्याध्यक्ष पदावरून थेट विध्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्ति
मंजिरी धुरी यांची विद्यार्थी भारतीच्या राज्याध्यक्ष पदावरून थेट विध्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्ति
मुंबई प्रतिनिधि:- विद्यार्थी भारती संघटनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर.
विद्यार्थी प्रश्नावर आक्रमक पद्धतीने लढणारी आणि फुले शाहू आंबेडकरी विचारावर चालणाऱ्या विद्यार्थी भारती संघतनेची नुकताच झूम अँप च्या मार्फत मीटिंग झाली ज्यात सद्या तरुणांचा आवाज बनलेल्या आणि विध्यार्थी प्रश्न आक्रमक आणि अभ्यासू पद्धतीने हाताळणाऱ्या विद्यार्थी नेता मंजिरी धुरी यांची विद्यार्थी भारतीच्या राज्याध्यक्ष पदावरून थेट विध्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवड झाल्याचे संस्थापक किशोर जगताप ह्यांनी जाहीर केले,,
विध्यार्थी भारतीच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजिरी धुरी ह्यांच्या सोबत
राष्ट्रीय उपाध्यक्ष अर्जुन बनसोडे, कार्यवाह जितेश पाटील, संघटक शुभम राऊत, सचिव प्रणय घरत आणि प्रवक्ता म्हणून रत्नदीप आठवले यांची निवड झाल्याचे संघटनेच्या प्रथम अध्यक्ष ज्योती बडेकर ह्यांनी सांगितले
दर तीन वर्षानंतर बदलणाऱ्या ह्या विद्यार्थी भारतीच्या कार्यकारिणीत लहान वयात चांगल्या सामाजिक कविता करणाऱ्या पूजा मूधाने ह्यांची महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाली असून त्या राज्याचा कारभार नीट सांभाळतील असा विश्वास माझी राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.पूजा बडेकर ह्यांनी व्यक्त केली
शिक्षणाचे व आरोग्याचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे हे मुख्य ध्येय घेऊन संघटना गेली चौदा वर्ष विध्यार्थी प्रश्नावर लढत आहे अनेक यशस्वी आंदोलने संघटनेने केली आहेत पुढेही ती अशीच चालू राहावीत असे अपेक्षा माजी अध्यक्ष विजेता भोनकर ह्यांनी व्यक्त केली.
मीटिंग मध्ये उपस्थित सर्व आजी- माजी कार्यकारिणीने व स्मिता साळुंखे , राहुल घरत, आशिष गायकवाड व राकेश सुतार यांनी नवीन कार्यकारिणीचे कौतुक करत व आपली मत मांडत त्यांना पुढील कामासाठी सदिच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत