Header Ads

Header ADS

बोरखेडा हत्याकांडात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून -तिच्या सहचार भावंडांची केली हत्या

 

बोरखेडा हत्याकांडात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून -तिच्या सहचार भावंडांची केली हत्या

तीन संशयित ताब्यात

रावेर तालुका प्रतिनिधी (हमीद तडवी)तालुक्यातील रावेर  बोरखेडा रस्त्यावरील एका शेतातील घरात रहिवास करीत असलेले आदिवासी  कुटूंबातील आई वडील बाहेर गेले याचा पुरेपुर फायदा उचलत संकुचित वृत्तीच्या  भामट्यांनी चार भावंडांचा धारदार कुऱ्हाडीने वार करुन निर्घुण हत्या दिनांक १६ रोजी  केल्याचे सकाळी उघडकीस आली.या घटनेचा तपास लावण्यासाठी नाशिक पोलीस महासंचालकांच्या सुचनेनुसार जळगाव पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे यांनी पोलीस दलाचे तीन पथक तयार केले होते,त्यानुसार राञी उशीरा तीन संशयित ताब्यात घेण्यात आले  आहे.बोरखेडा येथील चार भावंडांचे हत्याकांड झाल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे हे घटनास्थळी ठाण मांडुन राञीपर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

      नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या त्या दापत्त्याने सोबत मोठ्या मुलाला नेले होते त्यामुळे घरी चार लहान  भावंडांची काळजी घेण्यासाठी मोठ्या मुलाने परिसरातील एक नातेवाईक  वजा मित्राला फोन करून घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते .मात्र या मित्राने आणखी दोन मित्राच्या  मदतीने मध्यरात्री दारूच्या नशेत भिलाला यांच्या घरी जाऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. यावेळी इतर तिघे भावंडे झोपेतून जागे झाल्यावर या तिघांनी चौघांच्या गळ्यावर कुर्‍हाडीने वार करून त्यांचा खून केला ताब्यात घेतले एक मुलगा अल्पवयीन आहे   


  

        घटना उघडकीस येताच गावाला गेलेल्या मुलाला विचारपूस केली त्याने घराकडे लक्ष ठेवण्यासाठी ज्याला सांगितले होते याचा तपास पोलिसांनी केला पोलिसांनी त्याला त्यांची खाकी दाखवताच त्याने इतर दोघांची नावे सांगितली घटनेनंतर पसार झालेल्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले यात एक अल्पवयीन आहे रात्री उशिरापर्यंत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ प्रताप दिघावकर ,पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे हे संशयितांकडून संपूर्ण घटनेची चौकशी करीत होते.

      चार भावंडांच्या हत्येने जळगाव जिल्हा हादरला आहे या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रावेर नजीकच्या बोरखेडा शिवारात येऊन हत्याकांडाची माहिती घेऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत माहिती जाणून घेतली आहे त्याबाबत त्यांनी पोलिसांना सूचनाही केल्या आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील,आ गिरीष महाजन,खा रक्षा खडसे,आ चंद्रकांत पाटील,आ शिरीष चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली व सातत्व केले.

     घटनास्थळावरून कुऱ्हाड व दोन दारूच्या रिकाम्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या असून पोलिसांनी त्या जप्त केले आहे. या कुर्‍हाडीने चौघा  बहिण भावंडांचा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे घटनास्थळावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

       ही घटना काल सकाळी  पोलीस प्रशासनाला कळताच जळगाव पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे यांनी क्षणाचा विलंब न करता सकाळी दहाच्या आधी घटनास्थळ गाठले होते,घटना जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरत होती,म्हणुन लोकांची घटनास्थळी गर्दी जमत होती,पोलीस गर्दी पांगवत असतांना स्वतः पोलीस अधीक्षक  डॉ प्रविण मुंडे यांनी सर्व कायदा-सुव्यवस्था सांभाळत लोकांना समजुन सांगत होते,त्यांनी सामाजिक व राजकिय दृष्ट्या तसेच मीडीया  पञकार यांना कोणालाच रोखुन धरले नाही,प्रत्येकाला विचारपुस करु दिली त्यामुळे बाहेरुन आलेले लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते,व पञकारांना या प्रकाराची माहिती मिळाली.दरम्यान पोलीस अधिक्षक डॉ मुंढे यांनी आपल्या सहकारी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,आयपीएस कुमार चिंथा,डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्यासह बाकी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे हे स्वतः घटनास्थळी ठाण मांडुन बसल्याचे दिसुन आले.

रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात झालेल्या हत्याकांडातील मयत मोठ्या मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी पुरावे शवविच्छेदनात आढळून आले आहेत त्यानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. 

        महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज जिल्ह्यात येत असून ते बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाची दुपारी साडे तीन नंतर भेट घेणार असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

     बोरखेडा येथील हत्याकांडांने प्रचंड खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून ते शनिवारी जिल्ह्यात येत आहेत. ते बोरखेडा येथे पिडीत कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल रात्री दिली होती.

     या अनुषंगाने आज सकाळी माहिती कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार  गृंहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा प्राप्त झाला आहे. यानुसार ना. देशमुख हे १.३० वाजता जळगावला विमानाने येणार असून ते दुपारी साडे तीन ते ४  वाजता बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाची भेट घेणार आहेत. याप्रसंगी ते अधिकार्‍यांशी चर्चा देखील करणार आहेत. यामुळे आता गृहमंत्र्यांच्या दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.