Header Ads

Header ADS

तीन तरुणांचा विज पडून मृत्यु ; चोपडा व आडगांव येथील घटना

 

तीन तरुणांचा विज पडून मृत्यु ; चोपडा व आडगांव येथील घटना

एरंडोल-चोपडा(वार्ताहर ):- येथे शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस व विजांचा गडगडाट सुरू झाला. त्यात ढोली शिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या  रविंद्र प्रभाकर महाजन(वय २२ )व महेंद्र उखर्डू पाटील( वय  २३)यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचे निधन झाले. तर चोपड्यात नगरपालिका कंत्राटी कर्मचारी काम करीत असतांना वीज पडून ठार झाला. 

आडगाव येथील दोन्ही तरुण उखर्डू पाटील यांच्या शेतात कपाशी वेचणी साठी गेले होते .संध्याकाळी अनपेक्षित जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट सुरु झाला. हे वातावरण पाहून घरी येण्यासाठी तयारी करत असताना, झाडाखाली उभे असलेल्या रवींद्र महाजन व महेंद्र पाटील यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना तात्काळ कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्यांचे शवविच्छेदन बाकी असल्याचे डॉक्टर वाघ यांनी सांगितले. त्याबाबत पोलीस स्टेशनला ही उशिरापर्यंत गुन्हा नोंदविणे बाकी होते. एपीआय श्री जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे .या अनपेक्षित घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तर चोपडा नगरपरिषद येथील पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचारी दीपक भागवत पारधी ३२  राहणार रामपुरा दुपारी रामपुरा भागातील कंपोस्ट डेपो मध्ये पाईपलाईनचे काम करीत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.