जळगाव जिल्ह्यात आज ७१ कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज ७१ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज 24 डिसेंबर 2020 च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री 6.00 वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार.
जिल्ह्यात आज दिवसभरात ३७ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३८२४ आहे . जिल्ह्यात सध्या ४१९ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ७१ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५५६२ झाली असून आज पर्यंत १३१९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ७१ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील 23 आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०२, भुसावळ ११, अमळनेर ०७, चोपडा ०४,पाचोरा ०१, भडगाव ००,धरणगाव ०१, यावल ०५ , एरंडोल ०१, जामनेर ०२, रावेर ०५,पारोळा ०२,चाळीसगांव ०७, मुक्ताईनगर ००, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०० असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत