Contact Banner

एटीएम कार्ड क्लोन करून पैसे काढणाऱ्या दोघांना अटक

 


एटीएम कार्ड क्लोन करून पैसे काढणाऱ्या दोघांना अटक

पुणे । एटीएम कार्ड क्लोन करून पैसे काढणारी टोळी पुणे पोलिसांनी जेरबंद केली आहे. याप्रकरणी सायबर विभागात मोठ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यादृष्टीने पोलिसांनी तपास करत एटीएम कार्ड क्लोनिंग करून बनावट एटीएम कार्डद्वारे पैसे काढणारी आंतरजिल्हा गुन्हेगारी टोळी नाशिक येथून जेरबंद केली. याप्रकरणी मोहंमद अकील आदिल भोरनिया , मोहंमद फैजान फारुख छत्रीवाला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्य ताब्यातून ३५९ बनावट तयार केलेले एटीएम कार्ड , १३ एटीएम स्कीमर डिव्हाइस यासह इतर साहित्य जप्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.