बेवारस प्रेताची ओळख" टेलर" मार्कने पटली..!सावदा पोलिसां ची कौतुकास्पद कामगिरी
बेवारस प्रेताची ओळख" टेलर" मार्कने पटली..!सावदा पोलिसां ची कौतुकास्पद कामगिरी
सावदा ( प्रतिनिधी )सुतगाव रेल्वे गेट जवळच दि २९ रोजी रेल्वे प्रवास करणारा दोघे पायांनी अपंग असलेला ३०ते ३५ वयोगटातील कटिंग झालेल्या मयत अवस्थेत मिळून आल्याने त्याचा तपास शोध त्याच्या शर्ट वर टेलरीग मार्क वरून सावदा पोलिसांनी तपासाचा छडा लावून ओळख पटविल्याने अडचणीच्या कामाची ओळख पाठविण्याच्या कामात यश संपादन करून शव नातेवाईक यांचे पर्यंत मार्गस्थ केल्याने पोलिसांचे कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
मयत हा अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील पुरुष असून तो दोन्ही दोन्ही पायांनी अपंग आहे. नमूद मयत इसमाच्या जवळपास त्याची ओळख पटेल असे कोणतीही वस्तू आढळून आली नाही. मयताच्या शर्टाच्या कॉलर वर प्रिया मेन्स वेअर विठ्ठलवाडी ईस्ट असा टेलर मार्क आढळून आला होता.
मयत इसमावर पीएम होणेसाठी प्रेत रावेर ग्रामीण रुग्णालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री डी डी इंगोले, पोलीस उपनिरीक्षक श्री आर डी पवार, पोलीस हवालदार संजीव चौधरी, सुनील कुरकुरे यांनी नेले असून मयताची ओळख पटवण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार संजीव चौधरी, सुनील कुरकुरे यांनी व्हाट्सअप माध्यमातून मेसेज प्रसारित करून अनोळखी इसमाची ओळख पडण्याचे आवाहन केले, तसेच मयताच्या शर्टाचे कॉलरवर असलेल्या टेलर मार्ग च्या माध्यमातून शोध घेण्यासाठी
हवालदार संजीव चौधरी, सुनील कुरकुरे यांनी मुंबई येथे त्यांच्या सहकाऱ्यांचे कडेस मेसेज पाठवले असतात यातील मयताची ओळख पटवण्यात यश आले आहे. मयताचे नाव ज्ञानेश्वर पांडुरंग सोनवणे वय ३६ राहणार नेपानगर भातखेडा तालुका नेपानगर जिल्हा बऱ्हाणपूर मध्य प्रदेश असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांचे समयसूचकता व आणि कामाची दांडगा जनसंपर्काचे माध्यमातून मयताची ओळख पटल्याने परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत