Contact Banner

जळगाव जिल्ह्यात आज ४५ कोरोना रुग्ण बाधित

 


जळगाव जिल्ह्यात आज ४५ कोरोना रुग्ण बाधित


(जळगाव प्रतिनिधी): आज १६ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार   रात्री ६.२२ वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार . 


           जिल्ह्यात आज दिवसभरात  ५१रूग्ण उपचारात   बरे  होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३५३३आहे . जिल्ह्यात सध्या ३५६रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात ४५ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५५२०५ झाली असून आज  पर्यंत १३१६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 


जळगांव शहर शंभराच्या आत:-

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या   माहिती  नुसार जिल्ह्यात आज ४५ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात  जळगाव शहरातील २८आहेत. 


असे आढळले रुग्ण:-


तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ०१, भुसावळ ०८, अमळनेर ०० , चोपडा ०० ,पाचोरा ०० , भडगाव  ००,धरणगाव ०१, यावल ०२ , एरंडोल ००, जामनेर ००, रावेर ००,पारोळा ००,चाळीसगांव ०२, मुक्ताईनगर ००, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०३असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.