जळगाव जिल्ह्यात आज ४८ कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज ४८ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज १७ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ६.१० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात ३३ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३५६६ आहे . जिल्ह्यात सध्या ३७० रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ४८ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५२५३ झाली असून आज पर्यंत १३१७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ४८ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील २० आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०३, भुसावळ ०४, अमळनेर ०७ , चोपडा ०० ,पाचोरा ०० , भडगाव ००,धरणगाव ०२, यावल ०० , एरंडोल ००, जामनेर ०५, रावेर ००,पारोळा ०१,चाळीसगांव ०५, मुक्ताईनगर ००, बोदवड ०१,इतर जिल्ह्यातील ००असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत