Contact Banner

सलग तीन दिवस बँका बंद राहणार

 


सलग तीन दिवस बँका बंद राहणार

वृत्त संस्था-नवीन वर्ष साजरं करण्यासाठी आपण जर कुठं बाहेर गावी जाण्याचे ठरत असेल, अथवा रोखीचे व्यवहार करण्याचे नियोजन असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण, या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित सर्व कामं गुरुवारपर्यंतच उरकून घेणे आवश्यक आहे.

    या आठवड्यात नाताळ असल्याने शुक्रवार २५ डिसेंबर बँकांना सुट्टी असेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देखील बँका बंद असतील. कारण, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. व यानंतर रविवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.