Contact Banner

सावदा शिवसेना शहर प्रमुख पदी नेहते व परदेशी तर संघटक भारंबे खाचणे यांची नियुक्ती


सावदा शिवसेना शहर प्रमुख पदी नेहते व परदेशी तर संघटक भारंबे खाचणे यांची नियुक्ती

सावदा प्रतिनिधी -रावेर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात शिवसेनेच्या तालुका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुका संपर्क प्रमुख मसुरकर यांनी राज्यात शिवसेनेची सत्ता असून जनतेची कामे करून पक्षाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे पक्षांतर्गत कोणताही गट तट न ठेवता एकजुटीने पक्षवाढीसाठी काम करावे असे आवाहन केले यावेळी त्यांनी सावदा शहरासाठी व परिसरासाठी शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ची घोषणा केली.
    यावेळी  शिवसेनेचे रावेर तालुका संपर्क प्रमुख मसुरकर यांनी सावदा शिवसेनेचे शहर प्रमुख पदी भरत वसंत नेहते व सुरज उर्फ बद्री संतोष परदेशी तर शहर संघटक पदी शरद गिरधर भारंबे व निलेश चंद्रकांत खाचणे यांची नियुक्तीची घोषणा केली व सावदा शहरासाठी उपतालुका  प्रमुख म्हणून धनंजय उर्फ लाला वासुदेव चौधरी यांचे निवृत्तीची घोषणा केली .या बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्‍हाद महाजन,योगीराज पाटील , तालुका युवा सेना अधिकारी प्रवीण पंडित रावेर,मिलिंद पाटील , शहर युवासेना अधिकारी राकेश घोरपडे, शहराध्यक्ष बंटी महाजन, रविंद्र पवार, संतोष महाजन तुकाराम कोळी ,सुधाकर महाजन उपस्थित व पदाधिकारी उपस्थित  होते.नवनियुक्त पदाधिकारी यांचे आमदार चंद्रकांत पाटील,शाम पाटील,दिगंबर महाजन,सुनील पाटील,मनोज माळी, गणेश माळी, चेतन माळी यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.